रत्नागिरी: कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षीपेक्षा जास्त रूग्ण आताच्या घडीला सापडू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज ८७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११०२९ वर पोहोचली आहे.

आजच्या दिवसात दापोलीत 16 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे दापोलीकरांनी सावधनता बाळगणं आवश्यक आहे. कोरोनाला गंभीरपणे घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये. मास्कचा वापर, सॅनिटीयझरचा उपयोग करणे आणि साबणाने हात धुणे हे आता महत्वाचे बनले आहे.

सध्याच्या घडीला गरज असेल तरच लोकांनी घरभर पाडावं. प्रशासन वारंवार याबद्दलच्या सूचना देत आहे. लोकांची जबादारी आता वाढली आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर स्वःची जबाबदारी ओळखून आपल्याला वागावं लागणार आहे.

त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे आज ३० रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या १०१०५वर पोहोचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती आज बुधवारी दि. ३१ मार्च 2021 रोजी जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ४
▪️दापोली १०
▪️चिपळूण १४
▪️गुहागर २
▪️खेड १३
एकूण ४३

अॅटीजेन
▪️रत्नागिरी ९
▪️चिपळूण १८
▪️ संगमेश्वर ६
▪️गुहागर २
▪️दापोली ६
▪️लांजा २
▪️राजापूर १
एकूण ४४

आताचे आकडे छातीत धडकी भरवणारे आहेत. हीच वेळ आहे स्वःवर आवर घालण्याची. प्रशासनाला आखणी कठोर बनायला.लावायचं की नाही हे आता जनतेच्या हातात आहे.