दापोली : तालुक्यातील दाभोळमधील दालभेश्वर पाखाडी येथे श्री दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांच्या नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला.
दापोली तालुक्यात इयत्ता दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या आर्या विनायक पदुकले व CET उत्तीर्ण श्रुतिका समीर नवजेकर आणि पहिली ते पदवीधार विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेत्या महिलांनाही यावेळी गौरवण्यात आलं.
या कार्यकमला दाभोळचे उपसरपंच उदय जावकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर मुरमुरे, चंद्रकांत पारदले, नंदिनी नवजेकर, माजी सरपंच उज्वला नवजेकर, सारिका उजाळ, दर्शना उजाळ, योगेश सुर्वे, दालभेश्वर पाखाडीचे अध्यक्ष रविंद्र नवजेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत उजाळ, दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सल्लागार प्रवीण वेद्रे, राजेंद्र पानकर, निलेश उजाळ, अनिल जाधव, सुभाष सकपाळ, प्रशांत उजाळ, सिद्धेश उजाळ, राजेंद्र जाधव, ओकार वेद्रे, नरेंद्र वेद्रे, राजेश नवजेकर, स्वप्निल नवजेकर, अमोल वेद्रे, रुतेश वेद्रे, केदार शिगवण, मितेंद्र जाधव, अनिरुद्ध भुवड, उत्तम उजाळ, अविनाश उजाळ, लंकेश उजाळ, किरण सकपाळ, धर्मेंद्र जाधव, समीर नवजेकर, अजित वेद्रे, किशोर जाधव, सुरेश आग्रे, रत्नप्रभा नवजेकर, महानंनदा उजाळ, माधवी वेद्रे, चंद्रभागा वेद्रे, प्रमिला उजाळ, सुरेखा भुवड व वाडीतील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल. श्रुतिका नवजेकर व आर्या पदुकले हिने सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने मंडळाचे आभार मानले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन वृंदली पानकर व अक्षता पानकर हिने केलं. मंडळाचे कार्यवाहक स्वप्निल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.