दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोली शहरातुन जोग नदी वाहते, ही सायकल फेरी या नदीला समांतर रस्त्यावरुन असेल.

नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह. नदीला जीवनवाहिनीही म्हणतात. अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव व वनस्पती यांचे नदीवर अवलंबून असलेले एक स्वतंत्र जीवसृष्टीचे चक्र अस्तित्त्वात असते. हे जाणून घेण्यासाठी आणि नदीचे नैसर्गिक चक्र बिघडू नये याबद्दल जनजागृती करण्यासाठी ही सायकल फेरी असेल. पूर येणे हा नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे, नुकताच सर्वांनी हे अनुभवलेही आहे.

सायकल फेरी आझाद मैदान ध्वजस्तंभ येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल.

सायकल फेरी मार्ग आझाद मैदान- केळस्कर नाका- बाजारपेठ- हनुमान मंदिर- पंचायत समिती- प्रांत ऑफिस- काकोबा मंदिर- मौजे दापोली ग्रामपंचायत- साईमंदिर- विजयवाडी- शिवसाई नगर- बांधतिवरे रस्ता (उतार सुरु होईपर्यंत)- पोस्टाची गल्ली- आझाद मैदान असा ८ किमीचा असेल. समारोप आझाद मैदानात ९.३० वाजता होईल.

सायकल फेरीसाठीच्या सूचना व नियम

सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात.

सायकल फेरीमध्ये सायकल हळूहळू, एकाच्या मागोमाग एक अशी चालवली जाते. No overtake. दर १ किमी नंतर थोडा वेळ थांबून कोणी पुढे-मागे होणार नाही याची काळजी घेतली जाते.

सोबत काही पालक, स्वयंसेवक बाईक घेऊन असतात. मास्क आवश्यक. सायकल फेरी मार्गावर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.

तरीही प्रत्येकाने सोबत पाण्याची बाटली, थोडा खाऊ ठेवावा. पाऊस असल्यास सोबत रेनकोट ठेवावा. सायकल हेल्मेट, हातात सायकल ग्लोव्हस असलेले चांगले.

अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९५४५१९८७१३ हे आहेत.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लब मार्फत विनामूल्यपणे अनेक सामाजिक उपक्रम, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते.

सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि इतरांनाही सायकल चालवायला प्रेरित करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सर्वानी सायकल चालवूया, प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपुया, तंदुरुस्त राहूया, मानसिक ताणतणाव घालवूया, प्रतिकारशक्ती वाढवूया आणि रोगमुक्त होऊया.