गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध केलेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला सध्या अल्प प्रतिसाद; चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित

गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध के लेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांत मुंबई व ठाण्याच्या विविध आगारातील अवघ्या दहा एसटी पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. पालघरमधून एकाही गाडीचे आरक्षण झालेले नाही. येत्या १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणासाठी २,२०० गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात साधारण ८०० ते ९०० गाडय़ा मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणासाठी जातील. तर १,२०० ते १,३०० गाडय़ा कोकणातून मुंबईत येतील. मुंबईतून जाणाऱ्या व येणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण १६ जुलैपासून सुरू झाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*