दापोली- तालुक्यातील हर्णै येथे संयुक्त राष्ट्रचे सदस्य असलेल्या तब्बल १९३ देशांच्या चलनी नोटांचे प्रदर्शन गिरीजा शंकर सभागृह, ब्राम्हणआळी येथे आयोजित करण्यात आले होते.

हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले व विनामूल्य होते. प्रदर्शनाला परिसरातील तालुक्यातील विद्यार्थी, पालक आदींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तरी सर्वानी उपस्थिती प्रार्थनिय आहे.

हर्णै येथील ग्रामस्थ सर्पमित्र व साहसी विद्या प्रकारांचे मार्गदर्शक भरत जोशी यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.मुंबई येथील संजय जोशी यांच्याकडे असलेल्या विविध देशातील नोटांचा संग्रह या प्रदर्शनात पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

संजय जोशी यांनी आजवर एकुण तब्बल ८ देशांमध्ये हे प्रदर्शन भरवण्याचा बहुमान मिळवला आहे. यावेळी संजय जोशी, भरत जोशी यांनी विद्यार्थ्यांजवळ संवाद साधला व विविध अनुभव सांगितले. यासाठी आळीतील रवींद्र यशवंत मेहेंदळे यांनी सभागृह उपलब्ध करुन दिले होते.