दापोली :- प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्ले , पिसई , आसूद , फणसू ,केळशी आणि साखळोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ या वयोगटातील (कोमार्बीड) गुंतागुंतीचे आजार असणाऱ्या व्यक्तींना covid-19 लस देण्यास सुरुवात झाली आहे. सदर आरोग्य केंद्रांवर आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन वारी लसीकरण सकाळी ०८ ते सायं.०५ पर्यंत करण्यात येणार आहे. लसीकरणाला येण्यापूर्वी www.cowin.gov.in ह्या साइटवरून कोवीड लसीकरणासाठी नोंदणी करता येते.1 नंबरवरून 4 जणांची नोंदणी करता येते . सदर शिबिरात येते वेळी ओळखपत्र निवडणूक ओळखपत्र , पॅनकार्ड, वाहन परवाना, आधार कार्ड या पैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जायचे आहे. अशी माहिती दापोली तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.