रत्नागिरी : आजपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी परिपत्रकाव्दारे केला आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला भारतीय दंड संहिता 1860 भारतीय साथ रोग नियमन अधिनियम 1897व महाराष्ट्र covid-19 उपाय योजना नियम 2020 तसेच आपत्ती व्यवस्थापण अधिनियम 2005सह अन्य तरतुदी नुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहायित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण या मिश्रा यांनी परवानगी दिलेली आहे.

15 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व महाविद्यालय विद्यापीठ सुरू करण्याचा आदेश मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांनी परिपत्रक काढून जाहीर केले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जिल्‍हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी कोविड-19ची दक्षता घेत वरील आदेश पारित केले आहेत.