मुंबईत आता २४ तास होणार कोरोना लसीकरण

मुंबईत आता आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक सुविधा असणाऱया खासगी रुग्णालयांना पालिकेने यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे मुंबईत दररोज एक लाख जणांना लस देता येणार असल्याने महिनाभरात ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*