रत्नागिरी (जी.मा.का.) दि. 23–जिल्हयात काल सायंकाळपासून 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 494 आहे. कालपासून कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 1, जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल 1, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 1 असे एकूण 5 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 363 झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची प्रमाण 73 टक्के आहे.
दरम्यान जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बहादूरशेख नाका चिपळूण येथील पुरुष रुग्ण (वय 72) तसेच शिवतर ता. खेड येथील पुरुष रुग्ण (वय 44) यांचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 झाली आहे.
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
आडे, ता. दापोली-1
दाभोळ, ता. दापोली-2
कडवई, ता. संगमेश्वर-1
अंधेरी, कारभाटले ता. संगमेश्वर-1
तिवरेवाडी, संगमेश्वर-1
इसवली ता. लांजा-1
निवळीफाटा हातखंबा ता. रत्नागिरी-1
पश्चिम बंगाल -1
मिलंद, राजापूर – 1
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 109 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 494
बरे झालेले – 363
मृत्यू – 23
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 108 + 1
(यात एक रुग्ण पुन्हा भरती झालेला आहे.)
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 44 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 14 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 7 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात १ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 28, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 4, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 2, असे एकूण 37 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 29 हजार 918 इतकी आहे.
आत्तापर्यंत 7 हजार 700 पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 456 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 274 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 494 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 7 हजार 763 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 182 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 182 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 50 अहवाल मिरज आणि 128 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 22 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 49 हजार 369 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 74 हजार 925 आहे.