मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ७८७ नवे कोरोनाग्रस्त वाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर ३८५३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.