देशातील कोरोना परिस्थिती गंभीर; गेल्या 24 तासांत तब्बल 354 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 53,480 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 354 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*