दापोलीत कोरोना रूग्णांची संख्या घटत आहे

दापोली तालुकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसत आहे..काही आठवड्यांपर्यंत रूग्णांची संख्या स्थिर होती. आता मात्र ती हळूहळू कमी होताना दिसत आहे. दापोली तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासात 7 कोरोना रूग्ण आढळले आहेत. दापोली तालुक्यासाठी ही निश्चितच दिलासादायक गोष्ट आहे.

कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी खबरदारीच्या सर्व उपायोजना आपल्याला पाळायच्या आहेत. प्रशासनाने स्पष्ट केला आहे की, गणेशोत्सव जवळ येत आहे. या काळात कोरोना चे नियम  काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत.

कोणत्या गावात किती रुग्ण आढळले आहेत याची आकडेवारी आपण पाहूयात

वडाचा कोंड दापोली – 3
पाजपंढरी – 1
रोवले – 2
गिम्हवणे – 1
एकूण – 7

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*