रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मंगळवारी रात्री रत्नागिरी तालुक्यातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात शहर पोलीस स्थानकातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या चाचणीमध्ये एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीये.