दापोली शहरामध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर


दापोली शहरातील बाजारपेठ फॅमिली माळ परिसरामध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून (1) बाजारपेठ, (2) फॅमिली माळ, (3) गाडीतळ, (4) केळसकर नाका, (5) मच्छी मार्केट हा परिसर पुढील आदेश येईपर्यंत कंटेनमेन्ट झोन म्हणून करण्यात आला आहे.

या परिसरातील मेडीकल व दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील, नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. आपल्या घरामध्ये राहून कोरोनाला हद्दपार करण्याचा कामात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन दापोली नगरपंचायतचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*