मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मनगढत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा डाव सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला.