चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच योगासने व त्वायकोंदो यामध्ये नेपुण्य प्राप्त केले आहे. त्वायकोंदो यामध्ये ब्लॅक बेल्ट धारक आहे.
या सर्व कला जोपासल्या आहेत, त्यामुळेच “मला यंदा राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून 26 जानेवारीला राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात सहभाही होण्याचा सन्मान मिळाला आहे,” अशा शब्दांत चिपळुणची दिशा पातकर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा पातकर हिची राजपथावरील संचलनासाठी निवड झाली आहे.
दिशा महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना’च्या (एनएसएस) माध्यमातून विविध उपक्रमात सहभागी होत. राजपथावर भारताचे सैन्य वगळता इतर कोणालाही संचलनात सहभागी होता येत नाही. ती संधी केवळ ‘एनएसएस’ मधूनच मिळवता येत असल्याने तिने त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
दिशा १९ महाराष्ट्र बटालियन कराड येथे दोन कँम्प मध्ये, कोल्हापूर मध्ये दोन कँम्प मध्ये तर पुणे येथे पाच कँम्प मध्ये निवड झाली होती. एकुण महाराष्ट्रामधुन १ लाख कॅडेड मधुन ५७ जणांची निवड करण्यात आली त्यामध्ये २३ मुली व ३४ मुलांची निवड २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी करण्यात आली आहे. २३ मुलीपैकी ८ जणी राजपथवर त्यापैकी ०६ आर्मी, १ नेव्ही, १ एअरफोर्स) ०९ मुली cultural तर ०६ मुली गार्ड ऑफ हाँनर साठी निवडण्यात आले आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह, शारीरिक क्षमता सिद्ध केली. त्यामुळेच संधी मिळाली. डिबीजे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. मधुसुदन माने, प्रिन्सिपल प्रा. संजय गव्हाणे व आई आणि बाबा यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.