संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे.संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*