मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस

मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली. असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*