
रत्नागिरी – महापूरग्रस्त चिपळूणकरांचे अश्रू पुसण्यासाठी उद्या दिनांक 25 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर येणार आहे. आजच मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाड येथे दौरा केला होता. आता उद्या ते चिपळूणला दौरा करणार आहेत. चिपळूणकरांसाठी ते काय मदत जाहीर करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दौरा कार्यक्रमाचा तपशील
मुख्यमंत्री ठाकरे सकाळी मुंबईतून हेलिकॉप्टरमधून आर.जी.पी.पी.एल. हेलिपॅड, अंजनवेल, ता. गुहागर येथे येतील. तिथून मोटारीने चिपळूणला येतील. दुपारी 12.20 वा. चिपळूण येथे आगमन, पूरग्रस्त भागाची पाहणी व आढावा बैठक घेतील. त्यानंतर पुन्हा आरजीपीपीएल. हेलिपॅड, अंजनवेल, ता . गुहागर येथून हेलिकॉप्टरमधून मुंबईत परत जाणार आहेत.

Leave a Reply