मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*