शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते.

हा सोहळा गणेश मंदिर प्रांगणात उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमात छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमात बी.एड.प्रथम वर्ष व बी.एड.द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी नाटक, पोवाडा आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून परीक्षक डॉ.मजगावकर, श्री.हातखंबकर, श्री पाटील, शिक्षक व विद्यार्थी यांना मंत्रमुग्ध केले.

सर्व प्राध्यापक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खुप सुंदर असे परफॉर्मन्स आले. सौ.सोनाली वाघमारे यांनी संचालन केले.प्राचार्य डॉ.राजश्री देशपांडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी डॉ.ठाकूर, डॉ. डोने, डॉ.नाईक, डॉ.भोसले, डॉ.लिहीतकर, डॉ.मस्के व प्रा. चाकोते उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*