ठाण्यात चेंबूरची पुनरावृत्ती! घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

ठाणे: मुंबईसह उपनगरात पावसाने जोर धरला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत चार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दुर्गा चाळ येथील घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*