मुंबई : मध्य रेल्वे गणपती उत्सवासाठी कोकणात ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल. पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या) पनवेल येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार व शनिवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सावंतवाडी रोडला २०.०० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून ७ ते २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार आणि शनिवारी २०.४५ वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१०फेऱ्या) पनवेल येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत गुरुवार व रविवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी १५.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी येथून ६ ते २० सप्टेंबरपर्यंत सोमवारी व शुक्रवारी २३.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पनवेलला पोहोचेल.सावंतवाडी रोड येथून रोज १४.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी १३.१० वाजता सुटेल व त्याच दिवशी २२.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.रत्नागिरी येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दररविवारी आणि गुरुवारी २३.३० वाजता सुटेल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल.