कोरोनाचं संकट गेल्या चार महिन्यांपासून आपल्यावर ओढवलं आहे. त्याचा मुकाबला आपण सर्व जण मिळून करत आहोत. आपल्याला आयुष्यात सणांवर एक वेगळं स्थान आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण गेल्या चार महिन्यात सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. लवकरच येऊ घातलेली बकरी ईदही साधेपणाने आणि सर्व नियम पाळून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व इतर लोकप्रतिनिधींनीही बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन यावेळी केले.

या बैठकीला अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्दीकी उपस्थित होते.

तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. मांडीचा आग्रह नको यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.

सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.