मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

मुंबई : एका कार्यक्रमावा जात असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रात्री 8 वाजताच्या आसपासची ही घटना आहे.

उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. यावेळी या गाडीत उदय सामंत एकटेच होते.

गाडीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या या अपघातात उदय सामंत यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहेत.

सर्वांच्या आशीर्वादाने मी सुरक्षित आहे असं उदय सामंत म्हणाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*