परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील-परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

एसटीच्या कुठल्याही खाजगीकरणाचा विषय नाही. मात्र दर्जेदार सेवा देण्यासाठी बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बस बांधणी करण्यात येणार आहे. पुर्ण क्षमतेने बससेवा चालवण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे गेल्या पावणेदोन वर्षात एसटीचे उत्पन्न घटले आहे. आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळेच एसटी पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. एसटीने यापुढे केवळ प्रवाशांवर अवलंबून न राहता उत्पन्न वाढीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच भाग म्‍हणून माहाकार्गोच्या माध्यमाने मालवाहतूक सुरु केली आहे. पुर्वी एसटीसाठी असलेले पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग प्रकल्प जनतेसाठी सुरु करण्यात येत आहेत. विविध मार्गाने एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*