सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलाअर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. कोरोना महामारीमुळं हे वर्ष आव्हानात्मक आहे. कोणतेही रडगाणे न गात जिद्दीने महाराष्ट्र थांबला नाही. थांबणार नाही, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, महिलांना आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करत आहोत. कृषी, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्राला गती देण्याचे काम केले, असं ते म्हणाले. राज्यातील जनतेचा माता भगिनी आशीर्वाद आहे. त्याला धक्का लागू देणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*