दापोलीतील उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून, कौटुंबिक वादातून घडली घटना

दापोली : तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव विनोद गणपत तांबे (वय 36, रा. उन्हवरे, बौद्धवाडी) असे आहे.

ही घटना काल रात्री उशिरा घडली असून, यामागील कारण कौटुंबिक वाद असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तांबे आणि त्याचा भाऊ यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते.

या वादाचे पर्यवसान काल रात्री गंभीर स्वरूप धारण करून खुनापर्यंत गेले.

रात्री उशिरा झालेल्या भांडणात भावाने विनोद तांबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी दापोली पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. खुनाचे नेमके कारण, हत्येचे स्वरूप आणि त्यामागील परिस्थिती याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. गावात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*