देवरूख : स्वप्नातील कोकण रेल्वे सत्यात आणणारे, माजी खासदार दिवंदत बॅ. नाथ पै यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी देवरूखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची निवड करण्यात आली आहे.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई यांच्यामार्फत वाटूळ येथे होणाऱ्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात दि. २ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते युयुत्सु आर्ते यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सन १९५३ पासून राजापूर-लांजा नागरिक संघ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत आहे.
कोकण विकासात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार देण्याची प्रथा सन २०२० पासून संघामार्फत सुरू करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या युयुत्सु आर्ते यांची बॅ. नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण कोकणातून बॅ. नाथ पै यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी युयुत्सु आर्ते यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जाहीर झालेल्या पुरस्काराने सामाजिक काम अधिक जोमाने करण्याचे प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया श्री. युयुत्सु आर्ते यांनी व्यक्त करून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.