रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्या, आवश्यक धोरणात्मक निर्णय आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रक्रियदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.

सकाळी ९.३० वाजता चहापान आणि नोंदणी होईल, त्यानंतर बैठकीत चर्चा करावयाच्या समस्या लेखी स्वरुपात नोंदविण्यासाठी ३० मिनिटे दिली जातील.
या बैठकीला डॉ. संजय भावे (कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), अतुल काळसेकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), केदार साठे (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, उत्तर रत्नागिरी) आणि राजेश सावंत (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, दक्षिण रत्नागिरी) उपस्थित राहणार आहेत.
तांत्रिक मार्गदर्शन:
१) काजू बोंडावर प्रक्रियेतून विद्यापीठाचे संशोधन मूल्यवर्धन – डॉ. किरण मालशे (शास्त्रज्ञ, डॉ. बा. सावंत कोकण कृषी विद्यापीठ)
२) काजू लागवडीसाठी शासनाचे प्रोत्साहन, कोकणातील काजूचे उत्पादन मूल्य, आफ्रिकन काजूच्या तुलनेत गुणवत्ता, प्रक्रिया संधी – शिवकुमार सदाफुले (जिल्हा अधीक्षक, कृषी रत्नागिरी)
३) काजू उत्पादन प्रक्रिया सद्यस्थिती व कृषी पणन मंडळाची काजू उत्पादकांसाठी तारण कर्ज योजना – मिलिंद जोशी (उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोकण विभाग)
४) सहकारी तत्वावर/काजू क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणाऱ्या संधी, रिव्होलविंग फंड, ब्रँडिंग, ग्राहकांचे प्रबोधन इत्यादीची आवश्यकता – विवेक अत्रे, जयवंत उर्फ दादा विचारे, धनंजय यादव, अमित आवटी (सहकार भारती)
या बैठकीत काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांना त्यांच्या समस्या मांडण्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची संधी मिळणार आहे.
निमंत्रक:
या कार्यक्रमाचे शैलेश दरगुडे, डॉ. गणेश बांदकर, सुनील देसाई, रवींद्र अमृतकर (कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन) विवेक बारगीर, संदेश दळवी, संदेश पेडणेकर (रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियादार) निमंत्रक आहेत.