रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि “स्वदेशी वापरा” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणत या कर्मचाऱ्यांना स्वदेशी बनावटीच्या बॅगमध्ये दिवाळी फराळ आणि दिवाळी साहित्य भेट देण्यात आले. 



या उपक्रमाचे आयोजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. 

कार्यक्रमाला १५५ कर्मचारी उपस्थित होते. स्वदेशी फराळ आणि भेटवस्तू मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून त्यांचे समाधान स्पष्टपणे जाणवले. अनेक कर्मचाऱ्यांनी “आमच्या कामाचे कौतुक झाल्याने खूप समाधान वाटले,” अशा भावना व्यक्त केल्या. 

या प्रसंगी सत्यवती बोरकर, नितीन गांगण, प्रसाद बाष्ट्ये, केतन कडू, सिद्धेश कडू, विजय माळवदे, कामना बेग, मनोर दळी तसेच इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

या उपक्रमाद्वारे रत्नागिरीतून “स्वदेशीचा संदेश” आणि “आत्मनिर्भर भारत” घडविण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.