रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली.
ही निवड ऐतिहासिक ठरली आहे, कारण रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच भाजपाचा सभापती निवडला गेला आहे.
नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात सुर्वे यांचे स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्राप्त झाली.
या निवडीमुळे भाजपाला संघटनात्मक बळ मिळणार असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.