दापोली:- दापोली तालुक्यात माजी आ. संजय कदम यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. दापोली तालुक्यातील अडखळ गणात विविध विकास कामांचा दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आ. संजय कदम व दापोली पंचायत समिती सभापती सौ.योगिता बांद्रे यांच्या प्रमुख उपस्थित नुकताच भुमिपुजन समारंभ सोहळा संपन्न झाला आहे.
दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी दापोली तालुक्यातील अडखळ गणातील मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत सायटे फाटा ते चिखली वाडी हद्द रस्ता करणे, अडखळ ग्रुप ग्रामपंचायत जलजिवन मिशन योजना अंतर्गत वाघवे चिखली वाडी येथे नळपाणी योजना करणे,अडखळ ग्रुप ग्रामपंचायत वाघवे चिखली वाडी सभागृह ते सड्याची धार पाखाडी बांधणे, अडखळ इरफानिया मोहल्ला ते जुईकर मोहल्ला खाडीपुल रस्ता डांबरीकरण करणे,अडखळ पाटीलवाडी बसस्टाॅप ते जोशी वाडी शंकर मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,अडखळ पाटील वाडी गणपती कट्टा व पाखाडी बांधणे,अडखळ पाटील वाडी नं -१ येथे संरक्षण भिंत बांधणे अशा विकास कामांचा भुमिपुजन समारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आ. संजय कदम व दापोली पंचायत समिती सभापती सौ.बांद्रे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमा प्रसंगी दापोली पंचायत समिती सभापती सौ.योगिता बांद्रे,अडखळ ग्रामपंचायत सरपंच रविंद्र घाग,जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मुंगशे, हर्णै माजी सरपंच प्रकाश रघुवीर,राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र चौगले,अल्पसंख्याक उपाध्यक्ष व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहबुब मुकादम,अडखळ गण उपाध्यक्ष कमलेश दळवी,जउर भाई कोंडविलकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव भरत निर्मळ, सलीम वडेकर, मौजम सोलकर,अमिर वाकणकर, जुईकर मोहल्ला अध्यक्ष मोहम्मद काझी, ग्रामपंचायत सदस्या रमीजा काझी,ग्रामपंचायत सदस्या अंजली मळेकर,अडखळ गण अध्यक्ष आशिष रहाटवळ, यशवंत शिगवण,मुंबई अध्यक्ष प्रकाश शिगवण,सचिव-बाळाराम दर्गे, दिपक शिगवण,उदय मसकर, प्रकाश लक्ष्मण शिगवण,ग्रामीण अध्यक्ष अशोक शिगवण,रमेशकुळे,निसार काझी, अकबर काझी, रीयाज काझी, आरीफ वाकणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.