रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 56 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 54 अहवालांमध्ये तब्बल 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीत 157 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 663 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.66 टक्के आहे. नव्याने 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 312 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 112 तर संस्थात्मक विलगीकरणात 45 रुग्ण उपचार घेत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*