दापोली : दापोलीतील नामांकित बॅडमिंटन ग्रुप फ्युचर बॅडमिंटन ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही दापोली विधानसभा क्षेत्र मर्यादित ओपन डबल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
फ्युचर बॅडमिंटन ग्रुप ने 2017 साली स्थापनेपासून सातत्याने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.
दापोली विधानसभा क्षेत्रातील बॅडमिंटनपटूंना हक्काचे व्यासपीठ या निमित्ताने प्राप्त झाले आहे. सदर स्पर्धा दिनांक 8 व 9 मार्च 2025 रोजी जॉली स्पोर्टस् दापोलीचे सुधाकर पीतांबर साबळे बॅडमिंटन हॉल येथे खेळवली जाईल.

विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही ठेवण्यात आलेली नाही.
प्रथम येणार्या जोडीस रु. 3000 व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकास रु. 2000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या जोडीस रु. 1000 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी रु. 800 प्रती जोडी फी आकारण्यात आहे. सदर स्पर्धा फेदर शटलकॉक वर खेळवली जाईल.
स्पर्धेत नाव नोंदणीसाठी खाली नमूद केलेल्या सदस्यांकडे संपर्क साधावा.
1 तेजस मेहता (8796282337)
2 अभिषेक (राजू) खटावकर (9422542323)
3 स्वप्नील मेहता (9960199046)
4 भूषण इस्वलकर (9028496021)
5 रोशन वेदक (8446406668)