बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित समारंभात महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे, डॉ. राम मेस्री, सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या तीस वर्षांपासून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले घाडीगांवकर यांचे कोकणातील विविध दैनिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून सदरलेखन सुरू आहे. त्यांचा ‘बाबा’ कवितासंग्रह आणि ‘वणवा’ लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला असून, तीन हजारांहून अधिक लेख, कथा आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

कोकणदीप मासिकाच्या तेवीसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

**Tags:** Babu Ghadigaonkar, Kokandeep Shikshanratna Award, Kokandeep, Mumbai, Yogeshdada Kadam, Marathi literature, education, award ceremony, Konkan, literary contributions

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*