दापोली :- दापोली तालुक्यातील टाळसुरे तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर कोयतीने वार करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वा. पडली.
अमोल थोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्या जमिनीवरुन वाद सुरू आहेत.
दरम्यान, गुरुवारी टाळसुरे-तेलीवाडी येथील ग्रामस्थ वाडीतील रस्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडत होते, तेव्हा अमोर थोरे याने ठेवलेल्या त्याच्या सेंट्रिंगच्या लाकडांवर वाडीतील ग्रामस्थांनी तोडलेल्या झाडांच्या फांद्या पाहून त्या फांद्या मिलिंद थोरे यानेच टाकल्याचा अमोलचा गैरसमज झाला.
या रागातूनच मिलिंद थोरे आणि त्याच्या पत्नीने तयार केलेली आंबा कलम अमोल कोयतीने तोडून नुकसान करू लागला.
मिलिंद थोर आणि त्यांची पत्नी अमोलला थांबवण्यासाठी गेले असता अमोलने मिलिंदच्या डोक्यात आणि त्याच्या पत्नीच्या उजव्या हाताच्या बोटावर मारून दुखापत केली. याप्रकरणी अमोल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.