अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी: काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली. काद्री यांच्या निवडीमुळे शहर काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, माजी आमदार हुस्नबानु खलीफे, वरिष्ठ नेते रमेश किर यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

काद्री यांना तळागाळातील कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. त्यांच्यापुढे रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीचे मोठे आव्हान आहे, ज्यामध्ये त्यांची कसोटी लागणार आहे.

जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्षांची निवड: प्रदेश काँग्रेसने रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी ब्लॉक अध्यक्षांची घोषणा केली. ४ जून रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतींनंतर लांजा ब्लॉक अध्यक्षपदी राजेश राणे, संगमेश्वर ब्लॉक अध्यक्षपदी काशीराम वाजे, गुहागर ब्लॉक अध्यक्षपदी गजानन उर्फ दिलीप वसंत जाधव आणि दापोली ब्लॉक अध्यक्षपदी मंगेश राजाराम मोरे यांची निवड झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*