जालना : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. अशात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून आता सरकार हवेतून ऑक्सिजन घेवून रुग्णालयांना पुरवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यभरात हा प्रयोग राबवणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.