दापोली : तालुक्यातील हर्णेमध्ये राहणारी अकसा असलम खान हिनं नवी मुंबई येथील डीवाय पाटील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझिनेस या विषयातून एमबीए ही डीग्री प्राप्त केली आहे.

अकसान १२७ विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिचं प्राथमिक शिक्षण १ली ते ४थी आर.आर.वैद्य हर्णै या शाळेत तर ५वी ते ७वी जि.प. उर्दू शाळा हर्णै मध्ये तर ८वी ते १०वी नॅशनल हायस्कूल हर्णै व ११वी,१२वी आर्ट्स अँड काॅमर्स ज्युनिअर कॉलेज हर्णै येथून झालं. तिनं पदवीचं शिक्षण ज्ञानदीप काॅलेज खेड मधून पूर्ण केलं. एम.बी.ए. साठी डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठात यप्रवेश घेत तिनं तिथेही आपला ठसा उमटवला आहे.

अकसा ही दि हर्णै एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष असलम खान यांची कन्या असुन तिच्या या यशा भागे तिच्या वडीलांचा सिंहांचा वाटा आहे. तसेच तिचे काका सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी सुध्दा तिला मोलाची साथ दिली तर मोठा भाऊ दानिश खान याने तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला.

अकसाच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.