दापोली : कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘आपले पॅनल’नं बाजी मारली आहे. या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांनी भरघोस मतं मिळून विजय नोंदवला.
यंदाच्या निवडणुकीत केवळ 28 टक्के मतदान झालं होतं. या निवडणूकीत दापोली तालुक्यातील 4 हजार 701 मतदारांपैकी केवळ 1 हजार 313 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. दापोली शिक्षण संस्थेच्या आदरणीय गोपाळकृष्ण सोहोनी विद्यामंदिर येथे आज मतदान प्रक्रिया पार पडली होती.
या निवडणुकीत मनीषा जोशी, श्वेता पेठे, संकेत गिम्हवणेकर, वेदा गोरे, सागर गोसावी हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर एक जागा रिक्त आहे.
संचालक मंडळाच्या 9 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहेत.
1) केदार जोशी 1037
2) रवींद्र जोशी 872
3) संजय जोशी 872
4) अविनाश कर्वे 818
5) दत्ता जोशी 815
6) डॉ. अनिरुद्ध डोंगरे 803
7) अजय जोशी 798
8) विद्याधर दाबके 774
9) किशोर आंबेकर 768
या निवडणुकीमध्ये उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यांची यादी खालील प्रमाणे आहे
1) चंद्रशेखर जोशी 506
2) श्रीपाद करंदीकर 461
3) महेश महाजन 273
या निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे.