आनंद पालव यांच्याकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार काढला

सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडे रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार

रत्नागिरी – येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत आज कार्यालयीन आदेश दिले आहेत.

सागर कुवेसकर

सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे देण्यात आलेला होता.

आनंद पालव

तथापि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सहायक आयुक्‍त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त श्री. कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

स्वत:च्या पदाचे काम पाहून दिलेल्या अतिरिक्त कार्यभार पदाचे कामकाज पुढील आदेश होईपर्यंत पाहण्याबाबत कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*