राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी अनेक पायाभूत सेवांच्या उभारणीसंदर्भातील घोषणा केली. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी कोकणाच्या विकासासाठी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केली. या रस्ता ५४० किलोमीटर लांबीचा असेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मागील अनेक दशकांपासून चर्चेत असणारा रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) या महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. हा महामार्ग एकूण ५४० किमीचा असणार आहे.