ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम

मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे वाभाडे काढत टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ए भाई… लक्षात ठेव सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना दिवचायचं न्हाय… म्हणत चांगलाच दम भरलाय.

अमृता फडणवीस यांच्या ट्विट

भाई जगताप यांनी एक खाजगी चॅनेलला मुलाखत देताना, “माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की, त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. विरोधकांनी वारंवार मागणी करूनही त्यांनी एकाचाही राजीनामा घेतला नव्हता.

ही मुलाखत विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाई जगताप यांना थेट दमच भरला. ए भाई, तु जो कोण असशील – माझ्यावर बोट उचलायचं न्हाय!

या ट्विटरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाई जगताप यांची प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाहीये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*