संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१९ जुलै) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवरच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक आज ११ वाजता होणार असून या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लोकसभा स्पीकर यांनी सुद्धा सर्वपक्षीय बैठक सायंकाळी ४ वा बोलवली आहे.भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक देखील आज आयोजित करण्यात येणार आहे. पावसाळी सत्रात होणाऱ्या कामकाजाबाबत ही बैठक होणार आहे.