अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.

या स्टँडची निर्मिती तालुक्यातील एक हरहुन्नरी, उपक्रमशील शिक्षक राजेशकुमार कदम यांनी लाॅक डाऊन काळात केली असून, अतिशय उपयुक्त असे हे स्टॅंड असल्याचे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा बागल व गटशिक्षणधिकारी संतोष देवराम भोसले व सर्व विस्तार अधिकारी यांनी सांगितले. तसेच अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे आणि कदम सरांचे विशेष कौतुक केले, आणि आभार मानले.