दापोली : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली येथील व्यवस्थापन समितीवरील नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालकपदासाठी अजय मेहता यांची निवड झाली आहे.

ही निवड महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 कब(1) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) अधिनियम 2014 च्या नियम 74 अन्वये पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून वेदा मयेकर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

नवनिर्वाचित संचालक अजय मेहता यांच्या निवडीच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मेहता, उपाध्यक्ष अतुल मेहता, संचालक सुजय मेहता, रविकांत गांधी, रमेश गिम्हवणेकर, माधवी शेट्ये, शैला मेहता, अरूण भुवड, अध्यासी अधिकारी वेदा मयेकर आणि व्यवस्थापक बी. आर. उपस्थित होते.

या निवडीमुळे संस्थेच्या व्यवस्थापन समितीला नवीन दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अजय मेहता यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा संस्थेच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा आहे.