दापोली (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली , कृषी महाविद्यालयमधील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींच्या कृषी अक्ष, कृषी निष्ठा व आपली माती, आपली माणसं या तीन गटांनी मिळून ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दिन म्हणजेच वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस अगदी उत्साहात साजरा केला.

या कार्यक्रमात कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके व कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.मकरंद जोशी, ग्रूप ग्रामपंचायत चिखलगावचे सरपंच दिनेश आडविलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. कुणकेरकर , कार्यक्रम समन्वयक डॉ.आनंद मयेकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. मंदार पुरी, डॉ. आशिष शिगवण व विषय विशेषज्ञ डॉ. उदय पेठे व डॉ. समीर काळे, गावचे अध्यक्ष संजय गोरीवले, सर्व वाडी अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ व महिला आदि. उपस्थिती
होते.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करून झाली. ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व विद्यालयाच्या विद्यार्थिनींना कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी कृषी दिनाचे महत्त्व पटऊन सांगितले आणि कृषी कन्याकडून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची योग्य प्रकारे माहिती घेऊन आपल्या शेतीमधील उत्पन्न कसे वाढेल याकरिता प्रयत्न करा, असे सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले.

तसेच विद्यार्थीनींनी शेतीचे महत्व, वाढत्या शेती विषयक समस्या याबद्दल गावकऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर गावात झाडे लावा झाडे जगवा असे घोषवाक्याच्या जोशात गावामध्ये जनजागृती व्हावी याकरिता वृक्षदिंडी काढून व सार्वजनिक ठिकाणी आवळा, पेरू, जांभूळ, शिवण, बांबू आणि खैर या पिकांच्या एकूण 160 रोपांचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्या करिता कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. मंदार पुरी, डॉ. आशिष शिगवण गाव अध्यक्ष संजय गोरीवले व त्यांचे सर्व पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर धुमाळ व सहाय्यक शिक्षिका छाया बांगर, तसेच कृषी अक्ष, कृषी निष्ठा आणि आमची माती आमची माणसं या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.