दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला ‘स्वरतरंग’ असे नाव देण्यात आले असून, यामध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीतकार भूषण मते, कवी आणि निवेदक मयुरेश वाघ, तसेच गिटारवादक संजीव पाडकर हे आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

Advertisement

या संगीतमय संध्येत विविध गीतकारांनी रचलेल्या कविता आणि गाण्यांचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

कार्यक्रमात ‘ट्रॉपिकल व्हेव’ हे शाकाहारी रेस्टॉरंटद्वारे खाद्यपदार्थ आणि मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत रंगणार असून, रात्री ८.३० वाजता अमर्यादित भोजनाची व्यवस्था असेल.

प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती ६९९ रुपये असून, १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी २९९ रुपये इतके आहे.

विशेष म्हणजे, १० वर्षांखालील मुलांना प्रवेश निःशुल्क आहे. या कार्यक्रमाची माहिती आणि बुकिंगसाठी प्रेक्षकांना आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 7507295869 हा देण्यात आला आहे.

अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा, हर्णे बायपास, दापोली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, संगीतप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय संध्या ठरणार आहे.

संगीत आणि काव्याच्या या अनोख्या संगमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.