दापोली : देशाची सेवा बजावण्यासाठी सीमेवर तैनात असलेले दापोली तालुक्यातील सुपुत्र महेश जाधव हे 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त झाले.
सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या महेश जाधव यांचं दापोली आणि माटवणमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.
सीमेवर त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली आहे. 27 डिसेंबर 1996 रोजी ते सैन्यात भरती झाली. देशाच्या विविध सीमेवर त्यांनी सेवा बजावली आहे.
जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशिल भागात त्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी यशस्वी सेवा देऊन ते आपल्या मूळ गावी परतले आहेत.
त्यांनी दाखवलेल्या शौर्या प्रती कृतज्ञता म्हणून खेड रेल्वे स्टेशन, दापोली आणि माटवणमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
हा वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. एन. पाटील (माजी मुख्याध्यापक माटवण हायस्कूल), श्रीराम महाडिक (सेक्रेटरी श्रीराम शिक्षण संस्था माटवण), शुभ्रा सावंत (पोलीस पाटील माटवण), विलास जाधव (अध्यक्ष, कोंथळ कोंड), ज्येष्ठ माजी सैनिक सखाराम चव्हाण, गोविंद पवार, अजित मोरे, संतोष महाडिक (प्रतिष्ठित नागरिक नवानगर), महेश शेलार (प्रतिष्ठित नागरिक भानगर), माजी सैनिक अनिल कदम, दापोली आजी-माजी सैनिक संघटना दापोलीचे अध्यक्ष सईद देशमुख, उपाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव सुदेश चिपळूणकर, संदीप यादव, सहसचिव सुनील इदाते व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व सभासद, जाधव यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होती.
दापोलीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महेश जाधव यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.